सुब्रत रॉय यांच्या तोंडावर शाई फेकली

सहारा समुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या अंगावर शाई यांना मंगळवारी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात आलं.

Updated: Mar 4, 2014, 04:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सहारा समुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या अंगावर शाई यांना मंगळवारी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात आलं.
पोलिस मंगळवारी जेव्हा सु्ब्रत रॉय यांना घेऊन सु्प्रीम कोर्टात येत होते. तेव्हा बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांच्या तोंडावर शाई फेकली. शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
शाई फेकणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव मनोज शर्मा असल्याचं सांगितलं तसेच आपण वकील असल्याचंही त्यांनी पोलिसांना सांगितलं. याआधी सुब्रत रॉय पोलिसांच्या ताब्यात होते, त्यांना सोमवारी लखनौहून दिल्लीला नेण्यात आलं होतं.
सु्प्रीम कोर्टाने रॉय यांच्याविरोधात अजामीन पात्र वारंट जारी केलं आहे. लखनौ पोलिसांनी त्यांना अटक करून सुप्रीम कोर्टात हजर केलं, त्यावेळी ही घटना घडली.
सहारा कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना २० हजार कोटी रूपये परत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने २०१२ साली दिले होते.
गुंतवणूकदारांच्या पैशांची वसुली करण्यासाठी सेबीला संपत्तीच्या लिलावाचे अधिकार देण्यात आले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.