भारताचा तिरंगा उलटा, तो फोटो चुकीचा पंतप्रधान कार्यालय

भारतीय तिरंग्याचा सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहे. भारताचा तिरंगा उलटा लटकवलेला असल्याचा फोटो एएनआयने ट्विटवर अपलोट केला होता.

PTI | Updated: Nov 21, 2015, 03:47 PM IST
भारताचा तिरंगा उलटा, तो फोटो चुकीचा पंतप्रधान कार्यालय  title=

नवी दिल्ली : भारतीय तिरंग्याचा सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहे. भारताचा तिरंगा उलटा लटकवलेला असल्याचा फोटो एएनआयने ट्विटवर अपलोट केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) तेराव्या शिखर परिषदेच्या ठिकाणचे भारतीय राष्ट्रध्वजाचा फोटो उलटा असल्याचा सोशल मीडीयावर व्हायरल झाला. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या पीआयबी विभागातील सहायक संचालक महिमा वसिष्ठ यांनी याबद्दलची माहिती देताना सांगितले, तो फोटो चुकीचा आहे.

असिआन परिषदेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्याशी औपचारिक हस्तांदोलन करताना मागच्या बाजूला असणाऱ्या स्टँडवर भारताचा राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने फडकवण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर फिरत होता. याबाबत टीका होऊ लागली.. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून लगेचच या प्रकाराची चौकशी करण्यात आली. या चौकशीअंती हे छायाचित्र चुकीचे असल्याचे स्पष्ट झाल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.