नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाची भेट दिल्यानंतर आता संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांचं वेतन वाढवण्याबाबत सरकार विचार करत आहे. राज्यसभा आणि लोकसभेत एकूण ८०० खासदार आहेत. त्यांची बेसिक सॅलरी ५०००० हून आता १ लाख रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे.
खासदारांच्या एका समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेतला आहे आणि आता हा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतिम निर्णय घेणार आहेत. पंतप्रधानांनी जर याला मंजुरी दिली तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच याबाबतचा बिल पास केलं जावू शकतं.
नव्या शिफारशीनुसार किती होणार पगार ?
- नव्या शिफारशीनुसार खासदारांचा पगार हा दुप्पट होणार आहे.
- पगार वाढीसोबतच भत्ता देखील वाढणार आहे.
- खासदारांच्या मतदारसंघात दौऱ्यासाठी आणि इतर रक्कम ९०००० असणार आहे.
- ऑफिस स्टाफला मिळणारा पगारही दुप्पट होणार आहे.
- सरकारी घरामध्ये फर्नीचरसाठी मिळणारा वार्षिक भत्ता 1,50,000 होणार आहे.
- खासदाराच्या मतदारसंघात १७०० रुपये हे फ्री ब्रॉडबँडसाठी दिले जाणार आहे.
- माजी खासदारांचं मासिक पेंशन 20,000 हून आता 35,000 रुपये होणार आहे.
- खासदारांचा पगार आणि भत्ता मिळून एकूण त्यांना 1,90,000 ऐवजी आता 2,80,000 रुपये मिळणार आहे.