चंदुने कडकडून आजोबांना मिठी मारली

पाकिस्तानच्या तावडीतून सोडवून आणलेल्या जवान चंदु चव्हाणची त्याच्या कुटूंबासोबत तब्बल १२४  दिवसानंतर भेट झाली. चंदु आणि त्याच्या कुटूबांची भेट ही अमृतसरच्या सैनिक रूग्णालयात झाली. या भेटीवेळी चंदुचा भाऊ भूषण, आजोबा चिंधा पाटील आणि मित्र उपस्थित होते. चंदूच्या भावानं आणि आजोबांनी  त्याची यावेळी कडकडून गळा भेट घेतली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 30, 2017, 08:12 PM IST
चंदुने कडकडून आजोबांना मिठी मारली title=

अमृतसर : पाकिस्तानच्या तावडीतून सोडवून आणलेल्या जवान चंदु चव्हाणची त्याच्या कुटूंबासोबत तब्बल १२४  दिवसानंतर भेट झाली. चंदु आणि त्याच्या कुटूबांची भेट ही अमृतसरच्या सैनिक रूग्णालयात झाली. या भेटीवेळी चंदुचा भाऊ भूषण, आजोबा चिंधा पाटील आणि मित्र उपस्थित होते. चंदूच्या भावानं आणि आजोबांनी  त्याची यावेळी कडकडून गळा भेट घेतली. 

चंदू अजूनही पाकिस्ताननं केलेल्या छळाच्या धक्यातून सावरलेला नाही. चंदू आता रूग्णालय परिसरात फिरू लागलाय. कुटुंबातील सदस्यांना भेटून आनंदी आहे. रूग्णालयातून त्याच्या धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावात असलेल्या नातेवाईकांसोबत त्यानं व्हिडीओ कॉलव्दारे संवाद साधला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. चंदुला घरी परत केव्हा पाठवले जाणार याबाबत मात्र अजुन सभ्रंम कायम आहे.