मुंबई : महाराष्ट्राची अस्मिता आणि देशांचा मानबिंदू म्हणून ज्याचा गौरवानं उल्लेख व्हायचा त्या 'आयएनएस विक्रांत'वर अखेर हातोड्याचे घाव पडलेत.
युद्धामध्ये शत्रूला पाणी पाजणारी ही युद्धनौका सध्या अखेरचे घणाचे घाव सोसते आहे... अतुलनीय शौर्याची गाथा असणारी आयएनएस विक्रांत युद्धनौका शर्थीचे प्रयत्न करुनही अखेर भंगारातच काढण्यात आलीय...
'आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीनं ६० कोटी रुपयांना 'विक्रांत' लिलावात विकत घेतली. दारुखाना येथे विक्रांत आणल्यानंतर शुक्रवारपासून विक्रांत तोडण्याच्या कामाला सुरुवात झालीय. पुढचे सहा महिने हे काम असंच सुरु राहणार आहे.
'आयएनएस विक्रांत' भारताच्या गौरवशाली इतिहासातील एक युद्धनौका म्हणून ओळखली जाते. विक्रांतने भारताच्या सामरिक इतिहासात कर्तृत्वाचा सोनेरी अध्याय लिहिलाय. नौदलाच्या सेवेतून १९९७ साली निवृत्त झालेल्या विक्रांतने नंतर एक तरंगतं संग्रहालय होत नौदलाची ताकद सर्वसामान्यांना दाखवण्याचं महत्त्वाचं कार्य केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.