`विंदू`च्या दाव्यांचा ललित मोदीकडून इन्कार

आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात झालेल्या खळबळजनक खुलाशावर आयपीएलचा माजी संचालक ललित मोदी याने तातडीनं खुलासा दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 25, 2014, 12:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात झालेल्या खळबळजनक खुलाशावर आयपीएलचा माजी संचालक ललित मोदी याने तातडीनं खुलासा दिलाय. `हे सांगून बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंहला काय सिद्ध करायचंय की तो आणि गुरुनाथ मयप्पन संत आहेत?` असं मोदीने म्हटलंय.
२०१३ च्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात कथित रुपात सहभागी असलेल्या विंदू दारा सिंहनं मीडिया कॉर्पनं केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये कॅमेऱ्यासमोर काही धक्कादायक खुलासे केलेत. यामध्ये, आयपीएल मॅच फिक्सिंगचं संपूर्ण प्रकरण केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यामध्ये झालेल्या वादातूनच समोर आलंय, असा विंदूनं दावा केलाय.
झी मीडिया कॉर्पच्या रिपोर्टरशी बोलताना विंदूनं दावा केला की, हे संपूर्ण प्रकरण मोदी आणि श्रीनिवास यांच्या महत्त्वकांक्षांचा परिणाम आहे. आपलं या प्रकरणात काहीही देणं-घेणं नसल्याचंही त्याचं म्हणणं आहे. ललित मोदीला कोणत्याही पद्धतीनं श्रीनिवासन यांना पदावरून दूर करायचंय, म्हणून त्यानंच हा सगळा खेळ केला... असं विंदूनं या स्टींग ऑपरेशनमध्ये म्हटलं होतं.
ललित मोदीनं विंदूच्या याच दाव्यांना फोल ठरवलंय. `तुम्हाला खरंच असं वाटतंय की या `नॉनसेन्स` गोष्टीवर मी प्रतिक्रिया देऊ` असा उलटप्रश्न त्यानं विचारलाय.

व्हिडिओ पाहा-

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.