इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय.

Updated: Sep 26, 2016, 03:24 PM IST
इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा title=

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय.

इस्रोकडून आज एकाच वेळी आठ उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत सोडण्यात आले. सकाळी नऊ वाजून 12 मिनिटांनी या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले. 

PSLV C35 प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. यात हवामान तसेच वातावरणाची संपूर्ण माहिती देणारा SCATSAT-1 हा उपग्रह प्रक्षेपित कऱण्यात आला. 

त्याचबरोबर मुंबई आयआयटीचा प्रथम, पीईएस विद्यापीठाचा पिसॅट, अल्जेरियाचे 3, कॅनड आणि यूएसचा प्रत्येकी एक असे आठ उपग्रह दोन वेगवेगळ्या कक्षांत सोडण्यात आले. 

पाहा व्हिडीओ