'इस्रो'चा सर्वात मोठा दळणवळण उपग्रह जीसॅट-16चं यशस्वी प्रक्षेपण

इस्रोनं विकसित केलेला सर्वात मोठा दळणवळण उपग्रह जीसॅट-१६चं यशस्वी प्रक्षेपण फ्रेंच गुयानाच्या तळावरून करण्यात आलं. जीसॅट-१६मध्ये तब्बल ४८ कम्युनिकेशन ट्रान्सपोर्टर्स बसवण्यात आलेत. 

Updated: Dec 7, 2014, 11:18 AM IST
 'इस्रो'चा सर्वात मोठा दळणवळण उपग्रह जीसॅट-16चं यशस्वी प्रक्षेपण title=

बंगळुरू: इस्रोनं विकसित केलेला सर्वात मोठा दळणवळण उपग्रह जीसॅट-१६चं यशस्वी प्रक्षेपण फ्रेंच गुयानाच्या तळावरून करण्यात आलं. जीसॅट-१६मध्ये तब्बल ४८ कम्युनिकेशन ट्रान्सपोर्टर्स बसवण्यात आलेत. 

भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री २ वाजून १० मिनिटांनी युरोपियन स्पेस कंपनी एरियनस्पेसच्या तळावरून हे उड्डाण झालं. जीसॅटसोबत अमेरिकेच्या डिरेकटीव्ही-१४चंही प्रक्षेपण एरियन ५ व्हीए २२१ या रॉकेटद्वारे करण्यात आलं. 

प्रक्षेपणानंतर लगेचच कर्नाटकमधल्या हसन इथल्या इस्रोच्या कक्षाकडे जीसॅटचं नियंत्रण हस्तांतरीत झालं. उद्या पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी जीसॅट १६चं पहिलं ऑर्बिट रायझिंग ऑपरेशन होईल, असं इस्रोच्या बंगळूरूमधील मुख्यालयानं जाहीर केलंय. 

जीसॅटची वैशिष्ट्य पाहुयात... 

> एरियन ५ VA २२१ रॉकेटद्वारे प्रक्षेपण

> जी-सॅट १६ हा इस्रोचा आजवरचा सर्वात मोठा दळणवळण उपग्रह

> जी-सॅट १६ उपग्रहामध्ये ४८ कम्युनिकेशन ट्रान्सपोर्ट्स

>उपग्रहाचं वजन ३ हजार १५० किलो

> INSAT-3E या दळणवळण उपग्रहाची जागा जी-सॅट१६ घेणार

> जी-सॅट १६ उपग्रहाचा कार्यकाल १२ वर्षांचा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.