जोधपूर : सेल्फीच्या फॅडपासून पंतप्रधान मोदीही दूर राहू शकले नाहीत... पण, हेच सेल्फीचं फॅड तुरुंगातील कैद्यांमध्ये पाहायला मिळालंय... तेही सोशल वेबसाईटवरून.
धक्कादायक म्हणजे, मोबाईल आणि इंटरनेट या सर्व सोयी-सुविधा तुरुंगातील कैद्यांना उपलब्ध झाल्या. ही घटना घडलीय जोधपूरच्या तुरुंगात... आणि तुरुंग प्रशासनाला या सर्व प्रकाराची कल्पनाही नव्हती.
हा सर्व प्रकार उघडकीस आला जेव्हा तुरुंगात बंद असलेल्या कैद्यांनी स्मार्टफोनचा वापर करत सेल्फी काढले आणि तुरुंगातूनच सोशल वेबसाईट फेसबुकच्या साहाय्याने हे सेल्फी लोकांशी शेअरही केले.
यासोबतच हे कैदी आपल्या गँगच्या साथीदारांना संदेशही पाठवत असल्याचं आढळलं. राजस्थानमध्ये सर्वात सुरक्षित मानल्या जाणारं जोधपूर तुरुंग अधिकाऱ्यांना याची भनकही नव्हती. मात्र, या घटनेनंतर खडबडून जागं झालेल्या अधिकाऱ्यांनी तुरुंगात सर्च ऑपरेशन सुरू केलंय. पण, पोलिसांच्या हाती मात्र अद्याप काहीच लागलेलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.