धक्कादायक: कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या चिमुरड्याचं गुप्तांग कापलं

कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या मुलाचं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली आहे. पीडित मुलाच्या आईवडिलांनी या क्रूरकृत्यासाठी कुटुंबातील व्यक्तींवरच संशय व्यक्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. 

Updated: Dec 3, 2014, 12:38 PM IST
धक्कादायक: कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या चिमुरड्याचं गुप्तांग कापलं

जयपूर: कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या मुलाचं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली आहे. पीडित मुलाच्या आईवडिलांनी या क्रूरकृत्यासाठी कुटुंबातील व्यक्तींवरच संशय व्यक्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. 

जयपूरमध्ये राहणारे अखिल जैन हे कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. तर त्यांची पत्नी पारुल या आंघोळीसाठी गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा १७ दिवसांचा मुलगा जोरजोरात रडू लागला. यामुळं घाबरुन पारुल बाहेर आल्या असता त्यांना मुलाचं गुप्तांग कापल्याचं आढळलं. 

यानंतर पारुल आणि त्यांच्या सासऱ्यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील चिमुरड्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र मुलगा खूपच लहान असल्यानं त्याच्यावर शस्त्रक्रिया करता येत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. पाच वर्षानंतरच ही शस्त्रक्रिया करणं शक्य असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. 

कुटुंबातील काही जणांनी तुमचे वैवाहिक जीवनच उध्वस्त करु अशी धमकी दिल्याचं अखिल जैन यांनी पोलिसांना सांगितलं आहे. पोलिसांनी या आधारे तपास सुरु केला असून प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यानं चौकशीनंतरच पुढील कारवाई करु, असं जयपूर पूर्वच्या पोलिस उपायुक्तांनी सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.