एका पदासाठी करण्यात आली, १९ लोकांची भरती

जम्मू कश्मीरमध्ये २००६ या वर्षी कल्चरल अकादमीतील आर्ट एन्ड लॅगवेज येथे चुकीच्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे दक्षता समितीच्या समोर आले आहे. अकादमीचे तत्कालीन सचिव रफीक अहमद मसुदी आणि अन्य आरोपींना विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Updated: Dec 2, 2015, 02:19 PM IST
एका पदासाठी करण्यात आली, १९ लोकांची भरती title=

श्रीनगर : जम्मू कश्मीरमध्ये २००६ या वर्षी कल्चरल अकादमीतील आर्ट एन्ड लॅगवेज येथे चुकीच्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे दक्षता समितीच्या समोर आले आहे. अकादमीचे तत्कालीन सचिव रफीक अहमद मसुदी आणि अन्य आरोपींना विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दक्षता समितीच्यानुसार आरोपींनी नियमाचे उल्लंघन करत पदाचा दुरूपयोग केला आहे. शिपाई, माळी, सफाई कर्मचाऱ्यांची आणि इतर पदांवर नियुक्त्या केल्या. दक्षता समितीने शोध केल्यानंतर त्यांच्या निरीक्षणात आले की माळीच्या एका पदांची जाहिरात २२ डिसेंबर २००३ ला काढण्यात आली. मात्र प्रत्येकक्षात १९ शिपाई, माळी, सफाई कर्मचारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामधील एक कर्मचारी स्थानिक नागरीक नसतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे  

तसेच जूनियर असिस्टेंट या पदासाठी दोन पदासंदर्भात जाहिरात करण्यात आली आणि प्रत्यक्षात मात्र १० लोकांना भरती करण्यात आल्याचे समोर आले आहे. यापुढील तपास दक्षता समिती करत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.