नवी दिल्ली : भविष्यनिर्वाह निधीच्या (PF) रकमेसाठी आता कंपनीच्या अनुमतीची गरज भासणार नाही. नव्या नियमांनुसार, भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेसाठी थेट भविष्यनिर्वाह निधी संस्था अर्थात ईपीएफओकडे अर्ज करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला PFचे पैसे सहज उपलब्ध होऊ शकतात.
PFचे पैसे मिळण्यासाठी अर्ज केल्यापासून तीन महिन्यानंतर कर्मचाऱ्याला पैसे मिळत होते. मात्र, नव्या नियमानुसार कंपनी सोडली किंवा पैसे काढण्यासाठी तुम्हाला कंपनीकडे अर्ज करावा लागणार नाही. त्याकरिता कंपनीच्या प्रमाणीकरणाची गरज भासणार नाही. थेट संस्थेकडे अर्ज करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा 'युनिव्हर्सल अकाउंट नंबर' (यूएएन) सक्रिय असायला हवा. थेट अर्ज करण्यासाठी कर्मचाऱ्यांना फॉर्म १९, फॉर्म-आयओसी आणि फॉर्म ३१ भरून आयुक्तांकडे देता येणार आहे.
यूएएन हा क्रमांक आधार कार्ड आणि बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. या बदलामुळे भविष्यात आम्हाला PFची रक्कम ऑनलाईन पद्धतीने देणे शक्य होईल, असे ईपीएफओचे आयुक्त के. के. जालान यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.