जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत १ दहशतवादी ठार, ४ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा परिसरात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळालंय. मात्र चकमकीत ४ जवान शहीद झाले आहेत. कूपवाडा इथल्या लोलबाच्या घनदाट जंगलात काल रात्रीपासून ही धुमश्चक्री सुरू आहे.

PTI | Updated: Oct 5, 2015, 12:41 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत १ दहशतवादी ठार, ४ जवान शहीद title=

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा परिसरात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळालंय. मात्र चकमकीत ४ जवान शहीद झाले आहेत. कूपवाडा इथल्या लोलबाच्या घनदाट जंगलात काल रात्रीपासून ही धुमश्चक्री सुरू आहे.

आणखी वाचा - पाहा व्हिडिओ : सीमेवर जेव्हा चिनी सैनिकांशी भिडले भारतीय सैनिक

उत्तर काश्मीरच्या लोलबाच्या जंगलात काही दहशतवादी लपले असून त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची माहिती लष्कराला रविवारी संध्याकाळी मिळाली असता त्यांनी लगेच शोधमोहिम सुरू केली. दहशतवाद्यांना त्यांची चाहूल लागल्यावर त्यांनी लष्कराच्या जवानांवर जोरदार गोळीबार केला. त्या गोळीबारास जवानांनी प्रत्युत्तर देत एक दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. मात्र या चकमकीत चार जवान शहीद झाले. ही चकमक अद्याप सुरूच असून सर्व दहशवाद्यांना कंठस्नान घालण्याचे जवानांचे प्रयत्न सुरू आहेत.

आणखी वाचा - पाकिस्ताननं पहिले दहशतवाद संपवावा, शरीफांच्या आरोपावर भारताचं प्रत्युत्तर

दरम्यान रविवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी त्राल इथल्या एन्काऊंटरदरम्यान जैश- ए-मोहम्मद संघटनेच्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं होतं. दोन्ही दहशतवादी पुलवामा जिल्ह्यातील हारी गावात लपले होते. अनेक तास चाललेल्या या धुमश्चक्रीत अखेर दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळालं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.