दिल्लीत होणारे जाट आंदोलन मागे

दिल्लीत होणारं जाट आंदोलन मागे घेण्यात आलंय. जाट आंदोलकांनी नियोजित संसद घेराव मागे घेतला. 15 दिवसांसाठी हे आंदोलन पुढे ढकल्याचं सांगण्यात आलंय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 20, 2017, 08:12 AM IST
दिल्लीत होणारे जाट आंदोलन मागे title=

नवी दिल्ली : दिल्लीत होणारं जाट आंदोलन मागे घेण्यात आलंय. जाट आंदोलकांनी नियोजित संसद घेराव मागे घेतला. 15 दिवसांसाठी हे आंदोलन पुढे ढकल्याचं सांगण्यात आलंय. 

आंदोलकांच्या 7 पैकी चार मागण्या मान्य करण्यात आल्यात. हरियाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. 

जाट समाजाला योग्य न्याय मिळेल असं हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल लाल खट्टर यांच्याकडून सांगण्यात आलं तर आंदोलनादरम्यान झालेल्या गुन्ह्याप्रकरणी सरकार विचार करेल असं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितलं.