जयललितांनी पाचव्यांदा घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे सत्ता सोडवी लागलेल्या अन्नाद्रमुक सुप्रीमो जयललिता आज जवळपास आठ महिन्यांनंतर पाचव्या वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे २८ मंत्रिदेखील शपथ घेणार आहेत. मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये हा शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे. 

Updated: May 23, 2015, 12:00 PM IST
जयललितांनी पाचव्यांदा घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ title=

चेन्नई : भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे सत्ता सोडवी लागलेल्या अन्नाद्रमुक सुप्रीमो जयललिता आज जवळपास आठ महिन्यांनंतर पाचव्या वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या २८ मंत्र्यांनीदेखली शपथ घेतली. मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. 

या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक नेते आणि अभिनेते उपस्थित झाले होते. भाजप नेते, केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन आणि सुपरस्टार रजनीकांत शपथग्रहण सोहळ्यात सहभागी झाले. अभिनेते रजनीकांत हेदेखील उपस्थित झाले.

शुक्रवारी आमदारांच्या बैठकीत ६७ वर्षीय जयललिता यांची औपचारिकरीत्या त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली होती.  

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयानं १२ दिवसांपूर्वी त्यांना निर्दोश ठरवल्यामुळे  त्यांचा मुख्यमंत्रिपदी परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.