`मोदी एक आव्हान... मोदी एक भस्मासूर`

नरेंद्र मोदी हे काँग्रेससाठी आव्हान आहेत, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 14, 2013, 12:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी हे काँग्रेससाठी आव्हान आहेत, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिलीय.
‘नरेंद्र मोदी आमच्यासाठी आव्हान आहेत. त्यांच्याकडे केवळ प्रशानकीय क्षमता नसून ते एका विचारधारेचं नेतृत्व करतात. ते उत्तम निवडणूक मॅनेजर आहेत. त्यांनी गुजरातमध्ये तीन निवडणुका जिंकत आपली क्षमती सिद्ध केलीय. पण, काँग्रेसला मोदींपासून कोणताही धोका नाही’ असंही काँग्रेसच्या थिंक टॅँकमधले महत्त्वाचे नेते असलेल्या जयराम रमेश यांनी स्पष्ट केलंय.
‘राहुल गांधींना सक्षम व्यवस्था निर्माण करायचीय. तर मोदींचा कोणत्याही व्यवस्थेवर विश्वास नाही. मोदी हे भस्मासूर असून त्यांनी प्रथम प्रवीण तोगडीया आणि आता लालकृष्ण अडवाणी यांना आपलं लक्ष्य केलंय’ अशी टीकाही जयराम रमेश यांनी यावेळी केलीय.

जयराम रमेश यांच्या या विधानावर भाजपनं जोरदार प्रतिहल्ला चढवलाय. विकास आणि राष्ट्रवादाची भाषा करणा-यांवर भ्रष्टाचाऱ्यांचा रोष असणारच, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी जयराम रमेश यांना टोला हाणलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.