विमान हवेत, एक पायलट झोपेत, दुसरा ‘आयपॅड’वर...

मुंबईहून 280 प्रवाशांना घेऊन ब्रसेल्सला जाण्यासाठी निघालेलं जेट एअरवेजचं एक विमान तुर्की वायुक्षेत्रात 5000 फूट उंचावरून हेलकावे खात खाली आलं... कारण, यावेळी एक पायलट झोपेत होता तर सह पायलट विमान सूचनांशी संबंधीत आयपॅड वर व्यस्त होती. 

Updated: Aug 14, 2014, 03:51 PM IST
विमान हवेत, एक पायलट झोपेत, दुसरा ‘आयपॅड’वर... title=

नवी दिल्ली : मुंबईहून 280 प्रवाशांना घेऊन ब्रसेल्सला जाण्यासाठी निघालेलं जेट एअरवेजचं एक विमान तुर्की वायुक्षेत्रात 5000 फूट उंचावरून हेलकावे खात खाली आलं... कारण, यावेळी एक पायलट झोपेत होता तर सह पायलट विमान सूचनांशी संबंधीत आयपॅड वर व्यस्त होती. 
गेल्या आठवड्यात ही घटना घडल्याचं उघड झालंय. जेट एअरवेजचं हे विमान गेल्या शुक्रवारी मुंबईवरुन ब्रुसल्सेला जात होतं. हे विमान जेव्हा टर्कीच्या पोहचलं तेव्हा अचानक 5000 उंचीवरुन खाली आलं. ‘डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन’नं ही घटना गंभीर असल्याचं सांगत विमानाच्या दोन्हीही पायलटला निलंबित केलंय.  
युरोपातील व्यस्त विमानमार्गावरून प्रवास करणारं हे विमान 34,000 फूटांवरून हेलकावे खात खाली कोसळत 29,000 फुटांवर आलं होतं.  
या दोन्ही पायलटला कारणे द्या नोटीस बजावण्यात आलीय. घटनेचा वेळी फ्लाइट कमांडर ‘रेस्ट’ करत होता. नियमानुसार फ्लाइट कमांडरला ‘कंट्रोल रेस्ट’ नियमानुसार काही वेळ झोपायची मुभा देण्यात आलेली आहे. एव्हिएशन रेग्युलेटर दुसऱ्या पायलटच्या चुकीची कारणं शोधत आहे.
जसं हे विमान खालच्या बाजुला आलं, अंकाराच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलनं विमानाला एक आपातकालीन संदेश धाडताना निर्धारित मार्गावरून न गेल्याविषयी जाब विचारला आणि ताबडतोब त्यांना आपल्या निर्धारित मार्गावर येण्याची सूचना केली. त्यानंतर पायलटला विमान खाली जात असल्याचं ध्यानात आलं. 
सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीत कमांडरनं आपणं कॉकपिटमध्ये ‘कंट्रोल रेस्ट’वर असताना झोप घेत असल्याचं कारण दिलं. तर सह पायलटनं आपण आयपॅड आणि इलेक्टॉनिक फ्लाईट बॅगवर काम करत असल्याचं कारण पुढे केलं.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.