नवी दिल्ली : देशद्रोही घोषणांप्रकरणी जेएनयूच्या अहवालात कन्हैय्या कुमार, उमर आणि अनिर्बान यांच्यासह ५ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आलीय.
मात्र यावर अंतिम निर्णय वाईस चान्सलर आणि चीफ प्रॉक्टर घेणार आहेत. जेएनयूत 9 फेब्रुवारीला झालेल्या देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणी विद्यापीठ प्रशासाननं एक उच्चस्तरिय चौकशी समिती नेमली होती. या समितीनं आपला अहवाल सादर केलाय.
याच अहवालात पाच विद्यार्थ्यांवर बडतर्फीच्या कारवाईची शिफारस करण्यात आलीय. विद्यार्थ्यांविरोधात फक्त व्हिडीओ फुटेजच नाही तर प्रत्यक्ष साक्षीदारही असल्याचे अहवालात म्हटलेय. त्यामुळे देशद्रोहाच्या आरोपात अटकेत असणारे उमर आणि अनिर्बान आणि कन्हैया कुमार यांच्या अडचणीत आता भर पडलीय.