हुंड्यासाठी न्यायाधीशाने केली पत्नीची हत्या!

लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ ही म्हण गुडगावमधील एका न्यायाधीशला पुरेपूर लागू पडतेय. जिथे लोकाना न्याय मिळतो त्या ठिकाणच्या एका न्यायाधीस सेवकांने कायद्याला लाजवेल असे काम केलेय.

Updated: Jul 20, 2013, 12:55 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, गुडगाव/b>
‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ ही म्हण गुडगावमधील एका न्यायाधीशला पुरेपूर लागू पडतेय. जिथे लोकाना न्याय मिळतो त्या ठिकाणच्या एका न्यायाधीस सेवकांने कायद्याला लाजवेल असे काम केलेय. या न्यायाधिशाला हुंडा हवा होता. तो मिळाला नाही म्हणून पत्नीचा जीवच घेतला.
या न्यायधीशाच्या पत्नीच्या हत्येला एक नवे वळण मिळालयं. मृत महिलेच्या कुटुंबाने न्यायाधीश रवनीत गर्ग आणि त्यांच्या कुटुंबावर हुंडयामुळे हत्या केल्याचा आरोप दाखल केलाय. पण न्यायाधीशांच्या घरचे म्हणतायत की, ही आत्महत्या आहे. या सगळ्या बाबींची चौकशी करण्यासाठी गुडगाव पोलिसांनी न्यायाधीश आणि त्यांच्य़ा कुटुंबीयाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

मृत महिला गीतांजली हिच्या वडिलांनी तिचे सासरचे छळ करायचे आणि त्यातूनच तिची हत्या केलीय, असा आरोप केलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गीतांजलीच्या शरीरतून तीन गोळ्या मिळाल्यात ज्यामुळे स्पष्ट होतं की, एखादा माणूस स्वत:वर तीन गोळया कशा काय झाडू शकतो? गुरुवारी अंतिम संस्काराच्या वेळी दोन्ही कुटुंबामध्ये मोठे भांडणे झाले. गीतांजलीचा मृतदेह गुडगाव पोलीस लाईनमधील पार्कमध्ये सापडलं होतं. गीतांजली हिचं लग्न नोव्हेंबर २००७मध्ये झालं होतं. त्यांना ३ आणि ४ वर्षांच्या दोन मुली आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.