मुझ्झफरनगर : मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात विधान करणाऱे हिंदू महासभाचे कार्यकारी अध्यक्ष कमलेश तिवारींच्या विरोधात शुक्रवारी उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये मुस्लिम नागरिकांनी निदर्शने केली. मोठ्या संख्येने नागरिक या निदर्शनात सामील झाले होते.
निदर्शनामुळे काही ठिकाणी बाजारही बंद होते. तिवारी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच तिवारी यांना फाशी देण्याची मागणीही निदर्शनकर्त्यांनी केली. तिवारी यांच्या विधानानंतर नवा वाद उद्भवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुझ्झफरनगरमध्ये तिवारींच्या विरोधात तब्बल एक लाख मुस्लिम नागरिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी तिवारींना फाशी देण्याची जोरदार मागणी या नागरिकांकडून करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.