मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणार बुलेट ट्रेन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यात दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये 9व्या वार्षिक शिखर चर्चेत दोन्ही देशांदरम्यान बुलेट ट्रेन नेटवर्कसह अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

Updated: Dec 12, 2015, 03:15 PM IST
 मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणार बुलेट ट्रेन title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यात दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये 9व्या वार्षिक शिखर चर्चेत दोन्ही देशांदरम्यान बुलेट ट्रेन नेटवर्कसह अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

सुरक्षा आणि आण्विक उर्जा क्षेत्रासह मुंबई-अहमदाबाददरम्यान पहिली बुलेट ट्रेन सुरु करण्याबाबही करार करण्यात आले.

शिखर चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली.

तसेच यावेळी एक मार्च 2016 पासून जपानी नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हलची घोषणाही यावेळी पंतप्रधानांनी केली. रेल्वे विकासासाठी जपान 10 अरब डॉलरची मदत देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.