नवी दिल्ली : वेगवेगळ्या कारणांवरून चर्चेत राहणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चर्चेत असतात. केजरीवाल अक्षय कुमारचा सिनेमा एयरलिफ्ट बघण्यासाठी सिनेमागृहात पोहोचले होते. पण तेथे उपस्थित लोकांनी त्यांचं स्वागत काही वेगळ्याचं अंदाजामध्ये केलं.
केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्यासोबत जसे सिनेमागृहात पोहोचले तसं काही लोकांनी मोदी-मोदीचे नारे लगावण्यास सुरूवात केली. यावर दोघांनी ही काही प्रतिक्रिया नाही दिली. काही दिवसांपूर्वी एका महिलेने केजरीवाल यांच्यावर शाई देखील फेकली होती.