नवी दिल्ली : मोदी सरकारने नवीन शिक्षणविषयक धोरणासाठी मागवलेल्या सूचनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या काही सूचना दिल्या आहेत. संघाची शिक्षणविषयक संघटना असलेल्या 'विद्या भारती'ने यासंदर्भात पुढील सूचना दिल्या आहेत
१) महानगरांतील शाळांची वेळ सकाळी ७:३० वाजल्यापासून सायंकाळी ७:३० म्हणजेच १२ तास इतकी असावी.
२) माध्यमिक शाळांमध्येच विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा शिकवली जावी, अशी सूचना केली आहे. शालेय वयात विविध भाषा शिकणे सोपे असते; म्हणून, शाळेतील विद्यार्थ्यांना मातृभाषा, संस्कृत, इंग्रजी, हिेंदी आणि प्रादेशिक भाषा शिकवल्या जाव्यात.
३) सर्व अभ्यासक्रम सहा तासात शिकवणे शक्य नसल्याने शाळेची वेळ वाढवावी.
४) महानगरातील विद्यार्थ्यांना क्लासेसला जाण्याची गरज भासणार नाही; तर शाळेच्या वेळातच त्यांना नृत्य, संगीत आणि खेळाचे शिक्षण दिले जावे, जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांवर अतिरिक्त ताण पडणार नाही.
५) एक महत्त्वाची बाब म्हणजे १२ तास शाळेत असल्याने मुले आणि मुलींना इतका वेळ एकत्र न शिकता वेगवेगळे शिकवावे, अशीही एक सूचना त्यांनी केली आहे.
६) शिक्षकांची भरती करण्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जावी, ज्याची पात्रता कमीत कमी ५०% इतकी असावी.
७) शिक्षकांची उपस्थिती मोजण्यासाठी शाळांच्या वर्गांत CCTV कॅमेरे लावले जावे आणि बायोमेट्रीक पद्धत लागू करावी अशी सूचना या प्रस्तावात आहे.