लैंगिक छळ हा शारीरिक, मानसिक आणि शाब्दिकही... हे तुम्हाला माहीत आहे का?

या कायद्यांची तोंडओळखही तुम्हाला नसेल तर हे वाचाच... 

लैंगिक छळ हा शारीरिक, मानसिक आणि शाब्दिकही... हे तुम्हाला माहीत आहे का?

मुंबई : लैंगिक छळ म्हणजे नेमकं काय? लैंगिक छळ का केवळ शारीरिक असतो का? शाब्दिक आणि मानसिक लैंगिक छळ असतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आम्ही देत आहोत. महिलांच्या सुरक्षेसाठी देशाच्या संविधानात अनेक कायदे आहेत. या कायद्यांची तोंडओळखही तुम्हाला नसेल तर हे वाचाच... 

- सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महिलेकडे पाहून असभ्य गाणं गुणगुणत इशारे करणं हादेखील लैंगिक छळाचा एक भाग आहे. आयपीसी कलम २९४ प्रमाणे गुन्हेगाराला तीन महिन्यांची कैद किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं. 

- एखाद्या महिलेकडे बळजबरीनं लैंगिक सुखाची मागणी करणं हादेखील आयपीसी कलम ३५४ (ए) प्रमाणे गुन्हा आहे. दोषीला १ - ३ वर्षांपर्यंत कैद किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं.

- एखाद्या महिलेचा तिच्या कळत-नकळतपणे मागोवा घेणं, तिला फॉलो करणं गुन्हेगाराला महागात पडू शकतं, कारणं हा देखील आयपीसी कलम ३५४ (डी) प्रमाणे गुन्हा आहे. दोषीला दंडासहीत ३-५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. 

- लैंगिक सुखाच्या मागणीला एखाद्या महिलेनं दिलेल्या नकारामुळे तिच्या शारीरिक, प्रतिष्ठा किंवा मालमत्तेला हानी पोहचवणं किंवा तशी धमकी देणं हा देखील गुन्हा आहे. (आयपीसी कलम ५०३) दोषी पुरुषाला २ वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं.

- एखाद्या महिलेच्या खाजगी क्षणांत तिच्या परवानगीशिवाय तिला पाहणं किंवा फोटो, व्हिडिओ काढणं किंवा ते शेअर करण हा देखील आयपीसी कलम ३५४ (सी) प्रमाणे गुन्हा आहे. दोषीला १-३ वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं.

- कामाच्या ठिकाणी प्रमोशनसाठी किंवा पगारवाढीसाठी एखाद्या वरिष्ठ सहकाऱ्यानं लैंगिक सुखाची मागणी करणं हा लैंगिक छळ आहे. (विशाखा गाईडलाईन्स)

- एखाद्या महिलेच्या फोटोशी छेडछाड करणं आणि तो महिलेचा छळ करणं किंवा तिच्या प्रतिष्ठेला हानी पोहचवण्यासाठी इतरांशी शेअर करणं हादेखील लैंगिक छळाचा एक भाग आहे. आयपीएस सेक्शन ४९९ प्रमाणे यासाठी २ वर्षांची शिक्षा, दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं.

- त्रास देण्यासाठी एखाद्या महिलेविषयी कोणतीही आक्षेपार्ह गोष्टी सोशल प्लॅटफॉर्मवरून शेअर करणं हादेखील गुन्हा आहे. आयटी अॅक्ट सेक्शन ६७ नुसार दोषीला २ वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. 

- सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महिलेवर आक्षेपार्ह आणि लैंगिक कमेंटस् करणंही तुम्हाला भोगावं लागू शकतं. आयपीसी सेक्शन ५०९ प्रमाणे दोषीला ३ वर्षांची शिक्षा आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. 

- चुकीच्या उद्देशानं एखाद्या महिलेला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करणं हादेखील गुन्हा आहे. आयपीसी कलम ३५४ (ए) नुसार दोषी व्यक्तीला ३ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. 

- ऑफिसनं दिलेल्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीच्या गाडीमध्ये असा काही प्रकार घडल्यानंतरही तुम्ही 'कामाच्या ठिकाणी महिलेचा लैंगिक छळ कायदा, २०१३'नुसार तक्रार नोंदवू शकता.

- तुम्ही तक्रार नोंदवायला गेल्यावर तुम्हाला समजणाऱ्या भाषेत तक्रार नोंदविली जातेय, याची काळजी घ्या... हा तुमचा हक्क आहे. 

- कायद्यानुसार, एखाद्या महिलेनं लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यानंतर ९० दिवसांच्या आता त्याची चौकशी पूर्ण होणं बंधनकारक आहे. 

- लैंगिक छळाची तक्रार करणं हा तुमचा हक्क आहे. याविषयी तुम्ही कोणत्याही नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार (FIR) नोंदवू शकता.