नवी दिल्ली: कोहीनूर हिरा ब्रिटीशांनी भारतातून चोरून नेला असं आजपर्यंत आपण अनेक वेळा ऐकलं आहे. पण केंद्र सरकारचं मत मात्र वेगळंच आहे. केंद्र सरकारनं कोहीनूर हिरा भारतात परत आणण्याचे प्रयत्नच सोडून दिले आहेत.
कोहीनूर हिरा परत आणण्याची मागणी करू शकत नाही, कारण 1849 साली कोहीनूर हिरा महाराजा दिलीप सिंह यांनी इस्ट इंडिया कंपनीला भेट म्हणून दिला होता. कोहीनूर भारतातून लूटून नेण्यात आला नाही. त्यामुळे कोहीनूरला परत आणणं असंभव असल्याचं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे.
कोहीनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सांस्कृतिक मंत्रालयानं आपलं उत्तर दिलं आहे. आता परराष्ट्र मंत्रालयानं 6 आठवड्यांमध्ये ऍफिडेव्हिट दाखल करण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.