www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयकर भरण्यासाठी आजचा दिवस (सोमवार) शेवटचा दिवस आहे. सरकारनं बुधवारी, ३१ जुलै रोजी आयकर भरण्याची अंतिम मुदत वाढवून ५ ऑगस्टपर्यंत केली होती.
अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आज तुम्हाला शेवटची संधी मिळतेय. ई-रिटर्न भरणाऱ्या लोकांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेता अंतिम मुदत वाढवण्यात आली होती. आत्तापर्यंत एक करोडपेक्षा जास्त लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केलाय.
करदात्यांच्या सुविधेसाठी आयकर जमा करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (सीबीडीटी) मते यंदा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं कर भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय.
३० जुलैपर्यंत जवळजवळ ९२ लाख रिटर्न ई-पद्धतीनं भरले गेले होते. यंदाची ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६.८ टक्के अधिक आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.