नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांना लष्कर ए तोयबाच्या एका वरच्या फळीतील दहशतवाद्याला अटक करण्यात यश आलंय.
कथित स्वरुपात, युवकांची मनं बदलून, त्यांना भडकावून, त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होऊन, देशभर दहशतवादी हल्ल्यांना मूर्त स्वरुप देण्याचा कट रचणं तसंच दहशतावादी कारवाया कारवाया करण्याचं काम या दहशतवाद्यानं केलंय.
अधिकृत सूत्रांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय अब्दुल सुभान याला गेल्या आठवड्यात सराय काले खां बस स्टँडवरून अटक करण्यात आली होती. चौकशी दरम्यान त्यानं राजस्थान, हरियाणा तसंच बिहारच्या युवकांना प्रभावित करण्याचा खुलासा केलाय.
अब्दुल सुभान याचं नाव हरियाणाच्या मेवाड जिल्ह्यात राहणाऱ्या दोन आरोपींकडून – मोहम्मद शाहिद आणि कारी राशिद – यांच्या चौकशी दरम्यान समोर आलं होतं. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या दोघांनी सुभान हा लष्कर ए तोयबाच्यावतीनं तरुणांची भरती करत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर, सुभानच्या अटकेसाठी सापळा रचण्यात आला होता.
सुभानच्या अटकेमुळे आणि चौकशीमुळे दिल्ली पोलिसांना तसंच केंद्रीय सुरक्षा एजन्सीजना दिल्ली आणि जवळपासच्या भागांत तसंच देशातील इतर काही भागांत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची लष्कर ए तोयबाच्या कटाचा खुलासा करण्यात मदत मिळाली.
अब्दुल सुभानचा इतिहास
सुभान हे नाव काही देशातील दहशतवादी इतिहासाला नवं नाही. याअगोदरही गुजरातच्या पाटणा जिल्ह्यातील एक ट्रकमध्ये आरडीएक्स, ए के 56 रायफल्स, पिस्तूल, डेटोनेटर, टायमर आणि स्फोटक पदार्थ हस्तगत करण्यात आले होते.
याप्रकरणात सीबीआय अधिकाऱ्यांनी सुभानला अटक केली होती. एका न्यायालयानं त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास सुनावला होता. परंतु, सुभानच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याला 2010 साली साबरमती जेलमधून आठ वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुक्त करण्यात आलं होतं.
सुटकेनंतर मात्र सुभान आणखीनच घातक ठरला. जेलमध्ये राहण्याचा अनुभव घेतल्यामुळे त्याला दहशतवादी मदत मिळाली. तो पाकिस्तानात बसलेल्या लष्कर ए तोयबाच्या सूत्रधारांच्या इशाऱ्यावर आपल्यासारख्याच लोकांना दहशतवादी रस्त्यावर आणण्याचं काम करत होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभान आपल्या क्षेत्रातील मस्जिद आणि धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होत होता. तो योग्य वेळ पाहून आपली ओळख लष्कर ए तोयबाचा कट्टर दहशतवादी म्हणून सार्वजनिक करायचा. काही तरुणांना भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांत सहभागी करण्यात तो यशस्वीही झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.