निवडणूक आयोग आज विधानसभेचं रणशिंग फुंकणार?

गणपती बाप्पा आपल्या गावी जाण्याच्या तयारीत असतांना, निवडणूक आयोग आज महाराष्ट्र विधानसभेसाठी रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे. कारण निवडणूक आयोगाने उद्या नवी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

Updated: Sep 9, 2014, 07:26 AM IST
निवडणूक आयोग आज विधानसभेचं रणशिंग फुंकणार? title=

नवी दिल्ली : गणपती बाप्पा आपल्या गावी जाण्याच्या तयारीत असतांना, निवडणूक आयोग आज महाराष्ट्र विधानसभेसाठी रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे. कारण निवडणूक आयोगाने उद्या नवी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

दिवाळीआधी कुणाचं दिवाळं निघतं आणि कुणाचे दिवे लागतात, कारण ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीच्या पंधरवाड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडच्या निवडणूक कार्यक्रमाचं उद्या वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्येही यासोबत निवडणुका घेतल्या जातील का? हा ही एक प्रश्न उभा ठाकला आहे. कारण जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे.

एकीकडे गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी ढोल ताशांचा गजर सुरु असताना, उद्या महाराष्ट्राच्या निवडणुकांचे नगारे वाजण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगाची महत्वपूर्ण पत्रकार परिषद उद्या नवी दिल्लीमध्ये होणार आहे.

बाप्पाला निरोप देतांना मंडळात एकत्र असणारे कार्यकर्ते आता, निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.