महाराष्ट्र, हरियाणा राज्याच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला निवडणूक तर हरियाणात २७ ऑक्टोबरला होणार आहे.

Updated: Sep 18, 2014, 05:06 PM IST
महाराष्ट्र, हरियाणा राज्याच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबला निवडणूक तर हरियाणात २७ ऑक्टोबरला होणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी दिली. 

निवडणूक आयोगाने शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राची विधानसभा मुदत ८ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्याआधी निवडणुका होणे आवश्यक होते.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत नोटाचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षक नेमण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात ८ कोटी २५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.  निवडणूक अर्जातील प्रत्येक रकाना भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. ९०४३० एकूण मतदान केंद्र असणार आहेत

निवडणूक कार्यक्रम :

आजपासून आचारसंहिता लागू
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान
महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला मतदान
१९ ऑक्टोबरला मतमोजणी
बीड लोकसभा पोटनिवडणूक १५ ऑक्टोबरलाच
दिवाळीआधीच निवडणूक निकाल लागणार

- ऐन सणासुदीच्या काळात निवडणुकांचा उत्सव
- महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 8 नोव्हेंबरपर्यंत
- महाराष्ट्रात 288 जागांसाठी निवडणूक
- हरियाणात 90 जागांसाठी निवडणूक
- महाराष्ट्रात 8 कोटी 25 लाख मतदार करणार मतदान
- नागरिक अजूनही मतदार यादीत नाव नोंदवू शकतात
- ईव्हीएम मशिनवर 'नोटा'चा पर्याय उपलब्ध असेल
- महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच 'नोटा'चा वापर
- प्रत्येक जिल्ह्यात मॉडर्न पोलीस स्टेशन उभारणार
- महाराष्ट्रात 90 हजार 403 मतदान केंद्र
- उमेदवाराला अर्जातील प्रत्येक रकाना भरणं बंधणकारक
- एकही रकाना रिकामा असल्यास अर्ज रद्द होणार
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 27 सप्टेंबर
- अर्ज छाननी - 29 सप्टेंबर
- अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - 1 ऑक्टोबर
- 15 ऑक्टोबर रोजी होणार मतदान
- 19 ऑक्टोबर रोजी होणार मतमोजणी
- दिवाळीआधीच निकालाचा 'धमाका'
- बीडची पोटनिवडणुकीही 15 ऑक्टोबरला
- बीडच्या मतदार एकाच दिवशी दोनदा करणार मतदान
- आजपासून पुढचे 33 दिवस महाराष्ट्रात रणसंग्राम

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.