कोलकाताच्या न्यू मार्केटमधील सिटी मार्ट मॉलला भीषण आग

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या सिटी मार्ट मॉलला आज दुपारी भीषण आग लागली. कोलकाताच्या न्यू मार्केटमध्ये असलेल्या मॉलला आग कशी लागली, याचं कारण अद्याप कळू शकलं नाही.

Updated: Apr 26, 2015, 02:52 PM IST
कोलकाताच्या न्यू मार्केटमधील सिटी मार्ट मॉलला भीषण आग title=

कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या सिटी मार्ट मॉलला आज दुपारी भीषण आग लागली. कोलकाताच्या न्यू मार्केटमध्ये असलेल्या मॉलला आग कशी लागली, याचं कारण अद्याप कळू शकलं नाही.

आज दुपारी १२.३०च्या सुमारास मॉलला भीषण आग लागली. अग्नीशमन विभागाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचं आणि बचावकार्य सुरू आहे. मॉलमध्ये फसलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. 

आज रविवारचा दिवस असल्यानं मॉलमध्ये ग्राहकांची संख्या जास्त असते. मोठ्या संख्येनं लोक शॉपिंग करायला येत असतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.