नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी नेपाळसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत. आज दुपारी १२ वा ४३ मिनिटांनी नेपाळसह दिल्ली, यूपी, बिहार आणि पंजाब, मध्यप्रदेश आणि आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपामुळे दिल्लीतील मेट्रो सेवा थांबविण्यात आली असून अद्याप कोणत्याही हानीची माहिती मिळाली नाहीय.
या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील कोडारीजवळ होता. रिश्टर स्केलवर याची तीव्रता तब्बल ६.७ इतकी होती. आजच्या भूकंपामुळेही माऊंट एव्हरेस्ट शिखरावर तीन हिमस्खलन झालं आहे.
कालच्या भूकंपाचं केंद्रही नेपाळमधील लामजुंग होतं. त्यावेळी त्याची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल इतकी होती. नेपाळमध्ये आतापर्यंत १९१० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतातही भूकंपामुळे आतापर्यंत ५१ जणं दगावलीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.