गुलाम अलींचा कार्यक्रम कोलकत्यात करणार ममता बॅनर्जी

 मुंबई आणि पुण्यात पाकिस्तानचे सुप्रसिद्ध गझलगायक गुलाम अलींच्या कार्यक्रम रद्द झाल्यानंतर हा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्याची तयारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दर्शवली आहे. 

Updated: Oct 8, 2015, 09:00 PM IST
गुलाम अलींचा कार्यक्रम कोलकत्यात करणार ममता बॅनर्जी title=

कोलकाता :  मुंबई आणि पुण्यात पाकिस्तानचे सुप्रसिद्ध गझलगायक गुलाम अलींच्या कार्यक्रम रद्द झाल्यानंतर हा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्याची तयारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दर्शवली आहे. 

मुंबई आणि पुण्यातील ठरलेले कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द झाल्यानंतर गुलाम अलींना भारतात येऊ द्यावे आणि सीमेवरील वाद सांस्कृतिक कार्यक्रमात आणू नयेत अशी भूमिका विविध थरांतून व्यक्त झाली. 

दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी गुलाम अलींचा दिल्लीत कार्यक्रम झाल्यास त्याचे स्वागत करण्याची भूमिका घेतली. आता ममता दिदींनी पश्चिम बंगालमध्ये गुलाम अलींचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सहमती दर्शवली आहे.

संगिताला सीमा नसतात असे सांगत संगीत ही ह्रदयाची लय असल्याचे त्या म्हणाल्या. अशा कार्यक्रमासाठी आम्ही सगळी व्यवस्था करू असे ट्विट त्यांनी केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.