www.24taas.com, नवी दिल्ली
एफडीआयच्या मुद्यावरून केंद्र सरकार अडचणीत आलं आहे. सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याची घोषणा तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केलीय.
पुढील अधिवेशनात अविश्वासाचा ठराव मांडणार असल्याचं ममतांनी सांगितलंय. ममता देशभर आंदोलनही करणार आहेत. एफडीआयच्या मुद्यावरून ममतांनी सरकारविरोधात आक्रमक होत जोरदार निदर्शनं केली. एकीकडे ममता बॅनर्जींनी सरकारला धक्का दिलेला असतानाच दुसरीकडे डीएमकेनंही सरकारविरोधात मतदान करण्याचा इशारा दिलाय.
याशिवाय बाबूलाल मरांडी यांच्या झारखंड विकास पार्टीनंही यूपीएचा पाठिंबा काढलाय. यामुळे युपीए सरकारचं आसन डळमळीत झालं आहे. या सर्व घटनांमुळे युपीए सरकारची सध्या चांगलीच कोंडी झालीय.