'एटीएम' म्हणजे आता 'एनी टाईम मौत'?

अलाहाबादमध्ये एका एटीएममधून पैसे काढत असताना विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

Updated: Jul 7, 2015, 12:46 PM IST
'एटीएम' म्हणजे आता 'एनी टाईम मौत'? title=

अलाहाबाद : अलाहाबादमध्ये एका एटीएममधून पैसे काढत असताना विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

सराय ममरेज इथल्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या एटीएममध्ये हा प्रकार घडलाय. विजय कुमार असं या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.

या घटनेनंतर संतापलेल्या जमावानं बँक मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना बँकेतच कोंडून ठेवलं होतं. तरुणाचा मृतदेह बँकेबाहेरच ठेवून कारवाईच्या मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलनही सुरू केलं. 

धक्कादायक म्हणजे, दोन दिवसांपूर्वीही एकाला याच एटीएममध्ये शॉक लागला होता. त्यानं मॅनेजरकडे तशी तक्रारही दिली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच विजय कुमारला आपले प्राण गमवावे लागले, असं आंदोलकांचं म्हणणं आहे.

तक्रार आली असताना एटीएम सुरू का ठेवलं? तिथं सुरक्षारक्षक का नव्हता? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होतायत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.