हैदराबाद: तरुणीचा फोटो अश्लील बनवून सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केल्याच्या आरोपावरून एका २० वर्षीय तरूणाला अटक केली आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार तरूणाचे या तरुणीशी प्रस्तावित लग्न कुटुंबातील सदस्यांच्या वादामुळे मोडले. त्यामुळे हाताश होऊन त्याने हे कृत्य केल्याचे समजत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बी. सुनील रेड्डी असे या आरोपीचं नाव असून त्याला काल सायंकाळी अटक करण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, निजामाबाद जिल्ह्यातील भिकनूर भागात रेड्डी याचा विवाह १२ वीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीशी ठरले होते. परंतु, कुटुंबातील व्यक्तींमध्ये वाद झाल्याने लग्नाला मुलीकडून नकार देण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या तरूणाने तरुणीच्या फोटो अश्लील बनविला आणि सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केला.
रेड्डी याने तरूणीच्या अल्बममधून काही फोटो एकत्र केले आणि ते एडिट करून ते अश्लील बनविले आणि ते वेबसाइटवर पोस्ट केले.
पीडित तरूणीच्या वडिलांनी आणि मित्रांनी वेबसाइटवर असे फोटो पाहिला आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर निर्भया कायदा आणि आईटी अधिनियमांतर्गत रेड्डी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.