नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 'मन की बात'च्या माध्यमातून देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. रविवारी सकाळी अकरा वाजता रेडिओवरुन हा कार्यक्रम प्रसारीत होईल.
देशभरात सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत.. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन जाहीर केलं होतं.
Am happy that students, parents & teachers are sharing insightful thoughts for this Sunday's 'Mann Ki Baat' programme http://t.co/hxxnlOQPzN
— Narendra Modi (@narendramodi) February 20, 2015
पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमातून आकाशवाणीला फायदा होतोय. 'मन की बात'च्या माध्यमातून आकाशवाणीनं आतापर्यंत 25 लाख रुपयांची कमाई केल्याचं बोललं जातंय. या कार्यक्रमाचा प्रत्येक स्लॉट प्रति 10 सेकंद दोन लाख रुपयांना विकला गेलाय.
प्रादेशिक जाहिराती लक्षात घेऊन 'मन की बात' हा कार्यक्रम 14 प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्याची योजना आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.