नवी दिल्ली : शहिद हवालदार हंगपन दादा यांना गुरूवारी प्रजासत्ताक दिनी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. शांती काळात देण्यात येणारा हा सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे. डोळ्यात गर्वाचा भाव घेऊन हंगपन दादाची पत्नी श्रीमती चासेल लवांग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
शहीद हवालदार हंगपन दादा यांनी जम्मू काश्मीरात एका एन्काउंटरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. परंतु या चकमकीत त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.
उत्तर काश्मीरात कुपवाडामध्ये २७ मे २०१६ रोजी १२५०० फुटार काही दहशतवादी घुसखोरी करत असल्याची सूचना मिळाली. ३६ वर्षाचे हंगपन दाद यांनी दहशतवाद्यांनाचा सामना बहादुरीने केला.
अरुणाचल प्रदेशच्या बोदुरिया गावातील हवालदार हंगपन आपल्या टीममध्ये दादा नावाने प्रसिद्ध होते. भारतीय लष्कराने या संदर्भात एक हेलावणारा व्हिडिओ तयार केला आहे. पाहा व्हिडिओ...