पेट्रोप पंपवर सिगारेट ओढण्यास मनाई केल्यानंतर फेकला बॉम्ब

मध्य प्रदेशात धक्कादायक घटना घडली. एका पेट्रोल पंपावर सिगारेट ओढण्यास मनाई केली. याचा राग मनात घेऊन पेट्रोल पंप बॉम्बने उडविण्याचा तिघानी प्रयत्न केला. या तिघांना पोलिसांनी अटक केली.

PTI | Updated: Jul 7, 2015, 12:52 PM IST
पेट्रोप पंपवर सिगारेट ओढण्यास मनाई केल्यानंतर फेकला बॉम्ब title=

इंदोर : मध्य प्रदेशात धक्कादायक घटना घडली. एका पेट्रोल पंपावर सिगारेट ओढण्यास मनाई केली. याचा राग मनात घेऊन पेट्रोल पंप बॉम्बने उडविण्याचा तिघानी प्रयत्न केला. या तिघांना पोलिसांनी अटक केली.

गणेश रमाफ (२२), संदीप सिकरे (१८), अंजय कंडारे (२६) या तिघांना अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक बिट्टू सहगल यांनी दिली.

या तिघांनी ५ जुलैरोजी रात्री नशेत मधुमिलन चौका जवळील एका पेट्रोल पंपात गेले असता त्यांनी सिगारेट ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथील कमर्चाऱ्यांनी त्यांना रोखले. त्यावेळी दोघांनी यावेळी वाद घालण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सहगल यांनी दिली.

नशेतील या तिघांनी कर्मचाऱ्यांना धमकावले आणि तेथून निघून गेलेत. त्यानंतर काहीवेळाने ते आले आणि त्यांनी पेट्रोल पंपावर बॉम्ब फेकला. बॉम्ब फुटल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दम्यान पेट्रोल पंपाचे नुकसान झाले नाही. यावेळी पेट्रोल भरणाऱ्या एकाची बाईक जळाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.