सीआरपीएफ जवानांच्या पथकावर हल्ला, सहा जखमी

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी काही अज्ञात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सहा जवान जखमी झालेत.

Updated: Dec 7, 2015, 01:00 PM IST
 सीआरपीएफ जवानांच्या पथकावर हल्ला, सहा जखमी title=

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी काही अज्ञात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सहा जवान जखमी झालेत.

श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या जवानांच्या एका बसवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. बसवर केलेल्या या हल्ल्यात सहा जवान जखमी झालेत. 

जखमी झालेल्या सर्व जवानांना अनंतनाग येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. संपूर्ण परिसराला पोलिसांनी घेराव घातला असून दहशतवाद्यांचा तपास सुरु आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.