अबब!!! भारतात कच्च्या तेलापेक्षा पाणी महाग?

अबब!!! भारतात कच्च्या तेलापेक्षा पाणी महाग?

Updated: Jan 13, 2016, 04:00 PM IST
अबब!!! भारतात कच्च्या तेलापेक्षा पाणी महाग? title=

मुंबई : इट्स ऑफिशियल! भारतामध्ये मिनरल वॉटरपेक्षा क्रूड ऑईल म्हणजे कच्चं तेल स्वस्त झालंय. ७ जानेवारीला भारताला २९.२४ डॉलर्स प्रति बॅरल या दरानं कच्च तेल विकत घ्यावं लागलं. त्यावेळी डॉलरचा दर होता ६६.९१ रुपये.

त्यामुळे आपल्याला १,९५६.४५ रुपयांना १५९ लिटरचा एक बॅरल पडला. याचाच अर्थ एक लिटर कच्च्या तेलासाठी आपण केवळ १२ रुपये मोजले.

आपल्याकडे बाटलीबंद पाण्याची एक लिटरची बाटली किमान १५ रुपयांच्या घरात आहे. त्यामुळेच आता पाण्यापेक्षाही इंधन स्वस्त झालंय, असं म्हणता येईल. 



कच्च्या तेलावर प्रक्रिया करावी लागते, हे खरं असलं तरी स्वस्त झालेल्या कच्च्या तेलाचा फायदा ग्राहकांना म्हणावा तसा मिळालेला नाही. कारण गेल्या वर्षभरात केंद्र सरकारनं कच्च्या तेलाच्या उत्पादन शुल्कामध्ये ३ वेळा वाढ केली आहे.