धक्कादायक : सैनिकांना २० रुपयांची लाच; 'एअरबेस स्टेशन'वर गुरं चरतात

पठाणकोट एअरबेस स्टेशवर दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती हाती येतेय. सुरक्षा एजन्सीच्या चौकशी दरम्यान हा खुलासा झालाय. 

Updated: Jan 13, 2016, 02:07 PM IST
धक्कादायक : सैनिकांना २० रुपयांची लाच; 'एअरबेस स्टेशन'वर गुरं चरतात title=

नवी दिल्ली : पठाणकोट एअरबेस स्टेशवर दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती हाती येतेय. सुरक्षा एजन्सीच्या चौकशी दरम्यान हा खुलासा झालाय. 

मिळालेल्या माहितीनुसार, काही पैसे देऊन अनेक लोक या एअरबेस परिसरात आपली गुरं चरायला घेऊन जात होती. या भागात गस्तीला असणाऱ्या सिक्युरिटी गार्डसना अवघ्या २० रुपयांची लाच देऊन या अत्यंत संवेदनशील परिसरात जाण्याची परवानगीही अगदी सहज मिळत होती. 

लष्कराच्या उपाहारगृहात स्थानिक नागरिक राजरोस खरेदी करत असल्याचंही यावेळी उघड झालंय. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास 'एनआयएन'नं सुरु केल्यानंतर गुप्तचर यंत्रणेने ही विविध माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या हवाईतळाच्या बाजूला गुज्जर समाजाची लोकसंख्या आहे. हे लोक गुरे चरण्यासाठी बिनधास्तपणे या तळाचा वापर करतात. या हल्ल्यानंतर पंजाब सरकारने गुज्जर समाजाची लोकसंख्या मोजण्यास सुरुवात केली आहे.

हवाईतळावर अनेक दुकानं असून लष्कराचे विशेष कॅन्टीनदेखील आहे. यात स्थानिक लोक खरेदीसाठी येत असल्याचं समोर आलंय. यासाठी लागणारं बनावट ओळखपत्रही सुरक्षारक्षकच बनवून देत होते. या हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटी गुप्तचर यंत्रणेने केंद्रीय गृहखात्याला केल्या आहेत.