नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान किंवा चीनकडून गुप्तचर यंत्रणांनी सायबर हल्ल्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यामुळे सरकारनं मंत्रिमंडळ बैठक आणि सचिवस्तरावरच्या बैठकीत मोबाईल घेऊन जायला बंदी घातली आहे.
केंद्रीय सचिवालयानं काढलेल्या पत्रकामध्ये या बंदीबाबत सांगण्यात आलं आहे. मंत्र्यांच्या खासगी सचिवांनी ही माहिती मंत्र्यांना द्यावी असं या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे.
काँग्रेसनं मात्र या निर्णयावर टीका केली आहे. सरकारची ही हुकुमशाही वृत्ती असून त्यांना पारदर्शकता नको असल्याचं काँग्रेस नेते अजय कुमार म्हणाले आहेत.