नवी दिल्ली : अलीगडमध्ये एका अजब बालकाचा जन्म झालाय. याला पाहून डॉक्टरही हैराण झालेत. वेळेपूर्वीच जगात डोकावलेलं हे बालक सातव्या महिन्यातच जन्मलंय.
सातव्या महिन्यात बालकांनी जन्म घ्यायची ही काही पहिलीच वेळ नाही. परंतु, सातव्या महिन्यातील बालकांच्या तुलनेत हे बालक अर्ध्याहून कमी वजनाचं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सातव्या महिन्यात जन्मलेल्या बाळाचं वजन २.६ किलो असायला हवं... पण, या बाळाचं वजन केवळ ७५० ग्रॅम आहे. महत्त्वाचं म्हणजे, जन्माच्या वेळी एक किलोहून कमी वजनाच्या मुलांची स्थिती मेडिकल भाषेनुसार, 'हाय रिस्क' असते.
उल्लेखनीय म्हणजे, सातव्या महिन्यात जन्मलेलं हे बाळ इतकं छोटं आहे की ते एखाद्याच्या तळहातांतही सामावलं जाईल. जन्मल्यानंतरही कोणत्याही मेडिकल सुविधेशिवाय हे बाळ अजून जिवंत कसं? असा प्रश्न डॉक्टरांना पडलाय. परंतु, या बाळाच्या जिवीताला धोका अजून कायम आहे. त्याचा जन्म २१ मे रोजी झालाय.
या बाळाची आई पिंकी ही केवळ २० वर्षांची आहे. तिला पहिल्यापासूनच अनेक समस्या जाणवत असल्यामुळे डॉक्टरांना तिची डिलिव्हरी करावी लागली. सध्या, माखन लाल हॉस्पीटल अॅन्ड चाइल्ड केअर सेंटरमध्ये या बाळाला ठेवण्यात आलंय. डॉक्टर या बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.