भुवनेश्वर : ओरिसा विधानसभेत एक आमदार पॉर्न पाहतांना कॅमेऱ्यात कैद झाला. एका स्थानिक टीव्ही चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार, प्रश्नोत्तराच्या तासात हा आमदार आपल्या स्मार्टफोनवर पॉर्नचित्रपट पाहत होता.
या दरम्यान या आमदाराचं कृत्य कॅमेराबंद झालं आहे. या दरम्यान बीजू जनता दलच्या आमदाराने या आमदाराविरोधात कारवाईची मागणी केली आहे, हा आमदार काँग्रेस पक्षाचा आहे.
या आमदाराने मान्य केलं आहे की, आपण पॉर्न क्लिप पाहत होतो, पण हे नकळत झालं, झारसुगडाचे आमदार नाबा दास यांनी म्हटलंय की, मी माझं खासगी वेबपेज तपासत होतो, तेव्हा चुकून पॉर्नक्लिप लिंकवर क्लिक झालं. मी माझ्या आयुष्यात कधीही पॉर्न चित्रपट पाहिलेला नाही, या घटनेची चौकशी झाली पाहिजे, हे माझ्याविरोधाच षडयंत्र असल्याचं या आमदाराने म्हटलं आहे.
बीजेडीचे वरिष्ठ नेत्या आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रमिला मलिक यांनी म्हटलंय, के हे अतिशय लाजीरवाणं आहे, विधानसभा अध्यक्षांशी याविषयी आपण बोललो आहोत, आणि तत्काळ कारवाईची आपण मागणी केली आहे. ओरिसा प्रदेश भाजपने देखील काँग्रेस आमदारावर कारवाईची मागणी केली आहे.