www.24taas.com, नवी दिल्ली
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना बऱ्याचदा आपल्याला आपला मोबाईल नंबर बदलावा लागतो. मात्र आता त्याची गरज पडणार नाही. तुम्हांला तुमचा नंबर कायम ठेवता येणार आहे.
देशव्यापी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) सेवा येत्या १ फेबु्रवारीपासून ग्राहकांसाठी सुरू करण्याची घोषणा आज केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी केली.
या नव्या सेवेमुळे आता तुम्ही देशभरात कुठल्याही राज्यात जा, तुमचा मोबाईल नंबर तोच कायम राहणार आहे. राष्ट्रीय दूरसंचार धोरण (एनटीपी) २०१२ ची वेळेत अंमलबजावणी व्हावी या हेतूने दूरसंचार मंत्रालयाने तयार केलेल्या कृती आराखड्याला येत्या तीन महिन्यांत अंतिम स्वरूप दिले जाणार आहे, अशी माहिती सिब्बल यांनी दिली.