कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदी झाले भावूक

अलाहाबादमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

Updated: Jun 13, 2016, 06:26 PM IST
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदी झाले भावूक title=

अलाहाबाद : अलाहाबादमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी भावूक झाले. माझ्या शरीराचं कण अन कण आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण हा देशाला समर्पित असल्याचं सांगताना मोदी भावूक झाले. 

आपण आपली ताकद दाखवायला नाही तर संस्कार दाखवायला आलो आहोत असं मोदींनी कार्यकर्त्यांना सांगितलं. सेवाभाव, संतुलन, संयम, समन्वय, सकारात्मकता, सद्भावना आणि संवाद हे सात मंत्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिले.