नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळ्यापैशाच्या विरोधात कारवाईच चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी देखील रडारवर आहेत. सीए आणि कंपनी सेक्रेटरींविरोधात देखील कारवाई होऊ शकते. सरकार बोगस कंपन्यांच्या मदतीने काळापैसा सफेद करणाऱ्या प्रोफेशनल्स विरोधात देखील मोठी कारवाई करणार आहे.
सरकारचं म्हणणं आहे की, काळापैशांच्या बाबतीत सीएच अधिक महत्त्वाची भूमिका बजावतात. इडीने ४ दिवसांपूर्वी वीरेंद्र जैन आणि सुरेंद्र जैन यांना अशाच प्रकरणात अटक केली होती.
शंका आहे की, ११ हजार कोटींच्या या घोटाळ्यात ५४ प्रोफेशनल्स देखील सहभागी आहेत. ईडीने यासंदर्भात प्रोफेशनल्ससोबत देखील चौकशी केली. त्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवणार आणि दोषी आढळल्यास मनी लाँड्रिंग कायद्यानुसार कारवाई देखील करणार. जर अशा प्रकरणांमध्ये जर प्रोफेशनल्सचा सहभाग दिसला तर त्यांच्यावर मोठी कारवाई होऊ शकते. आतापर्यंत अशा प्रकरणात प्रोफेशनल्सवर कारवाई होत नव्हती पण आता सरकारने अशा लोकांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे.