सरकारची वर्षपूर्ती | २०० रॅली, ५ हजार सभांचा धडाका

सरकारचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारने रॅली आणि सभांचा धडाका लावला आहे, यासाठी ते २०० रॅली आणि ५ हजार सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आपली वर्षपूर्ती समारंभपूर्वक साजरी करणार आहे. 

Updated: May 24, 2015, 11:46 PM IST
सरकारची वर्षपूर्ती | २०० रॅली, ५ हजार सभांचा धडाका title=

नवी दिल्ली : सरकारचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारने रॅली आणि सभांचा धडाका लावला आहे, यासाठी ते २०० रॅली आणि ५ हजार सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आपली वर्षपूर्ती समारंभपूर्वक साजरी करणार आहे. 

 भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, २५ मे रोजी मथुरा येथे मोदींच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर २६ मे रोजी शेतकऱ्यांसाठीची खास वाहिनीचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. तसेच २६ मे रोजी हरियानातील कर्नाल येथेही रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

गुजरातमधील सूरत येथे २७ मे रोजी दुपारी ५ वाजता मोदी यांच्या सार्वजनिक सभेचे आयोजन केले आहे. तर २७ मे रोजी गोव्याच्या राजधानीत पणजी येथे मोदी एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

सरकारच्या कामगिरी जाहीर करण्यासाठी देशभरात २०० मोठ्या रॅली तर ५ हजार जनसभांचे आयोजन करण्यात आल्याचेही कुमार यांनी यावेळी सांगितले. मोदी यांच्यासह केंद्र सरकारमधील सर्व मंत्री, खासदार रॅलीमध्ये सहभाग घेऊन सरकारची वर्षभराची कामगिरी लोकांपर्यंत पोहचविणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.