www.24taas.com, झी मीडिया, मणीनगर
नरेंद्र मोदी या नावाचं वलंय सध्या देशात खूप मोठे दिसत आहे. तरी मोदी यांना एक नेता म्हणून पुढे आणण्यात मराठी भाषिक व्यक्तींचही तितकंच योगदान राहिलं आहे. मोदींच व्यक्तीमत्व हे रा. स्व. संघाने आणि नागपूरने जितकं घडवलं. तितकच मणीनगर मतदारसंघानेही घडवलं.
मणीनगर मतदारसंघानेच नरेंद्र मोदीं मधील एका प्रचारकाची छबी बदलून त्यांच्यातील नेत्याला पुढे आणलं. मणीनगर येथे मोदींनी संघाची विविध शिबिरे आयोजीत केली. या शिबिरांमध्येच संघटनेचे अनेक राष्ट्रीय नेते मोदींच्या संपर्कात आले. त्याकाळी मणीनगर हा प्रदेश मराठी माणसांची संख्या जास्त असलेला प्रदेश होता. या ठिकाणीच मोदींवर मराठी व्यक्तींनी संघनिष्ठेचे संस्कार करण्यात स्वत:च योगदान दिलं. विशेष म्हणजे गेली 12 वर्ष मणिनगर हा नरेंद्र मोदींचा मतदारसंघ राहिला आहे. मराठमोळ्या मणीनगर परिसरात संघविचारांचा दबदबा होता. राजकारणावर जास्त चर्चा होत नसली, तरी तत्कालीन व्यवस्थेला पर्याय शोधण्यावर मात्र वादविवाद झडत असे.
या वादविवादात मोदी हे तरुणपणी भाग घेत असत. त्यावेळी कोणला वाटलं देखील नव्हतं की हा तरुण भविष्यात देश चालवण्यासाठी पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार आहे.
गेल्या काही वर्षात मणीनगरचे स्वरुप बदलले आहे. हा भाग आता अहमदाबादचा मुख्यभाग झाला आहे. हल्लीच मणीनगरमध्ये उभारलेला दक्षिणी सोसायटी फ्लायओव्हर मोदींनी आपले गुरू, दुसरे सरसंघचालक मा. स. गोळवलकर यांच्या स्मृतींना अर्पण केला आहे. यातुनच मोदींचे मराठी प्रेम हे अजूनही दिसून येते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.