विजयानंतर मोदींनी केलं केशूभाईंचं तोंड गोड

स्पष्ट बहुमत मिळऊन भाजपाच्या नरेंद्र मोदींनी आपलं मुख्यमंत्रीपद राखलं आहे. 116 जागांवर विजय मिळवत पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले. विजय संपादन केल्यावर नरेंद्र मोदी प्रथम आपल्या आईला भेटले आणि त्यांनंतर त्यांनी आशीर्वाद घेतला तो केशूभाई पटेल यांचा.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 20, 2012, 05:26 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
स्पष्ट बहुमत मिळऊन भाजपाच्या नरेंद्र मोदींनी आपलं मुख्यमंत्रीपद राखलं आहे. 116 जागांवर विजय मिळवत पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले. विजय संपादन केल्यावर नरेंद्र मोदी प्रथम आपल्या आईला भेटले आणि त्यांनंतर त्यांनी आशीर्वाद घेतला तो केशूभाई पटेल यांचा.
नरेंद्र मोदींविरोधात उभे असणाऱ्या केशूभाईंना भेटून नरेंद्र मोदी यांनी प्रथम त्यांचा आशीर्वाद घेतला. नंतर दोघांनीही एकमेकांना मिठाई भरवत तोंड गोड केलं. बहुमत मिळताच नरेंद्र मोदींनी केशूभाईंची घेतलेली भेट चर्चेचा विषय बनली आहे.
नरेंद्र मोदींपूर्वी केशूभाई पटेल हे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. मात्र नुकतंच त्यांनी भाजपशी फारकत घेऊन स्वतंत्र पक्ष स्थापन केला. केशूभाईंनी यापूर्वी अनेकवेळा नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली होती. यंदा निवडणुकीत केशूभाईंचा पटेल फॅक्टर त्यांना काही प्रमाणात उपयुक्त ठरला होता.